कर्नल संतोष महाडिक
याना वीरमरण आलं. त्यांच्या हौताम्त्याच्या बातम्या गेले दोन दिवस सर्व माध्यमातून
आल्या. भारतमातेच्या या थोर सुपुत्रास, सह्याद्रीच्या कुशीत वाढलेल्या त्या थोर मावळ्यास
अखेरचा निरोप देताना डोळे पाणावले.
परवा भोपाळसाठी
गाडीत चढताना मनाच्या एका कोपर्यात हा खिन्न विचार होताच. पहाटे २ वाजता भुसावळ
स्टेशन आले. आमची झोप चाळवली. आमच्या कुपे मध्ये एक बर्थ रिकामा होता, त्या जागी
एक हट्टा कट्टा नवजवान त्याचं समान ठेवत होता. उंचापुरा आणि रांगडा तो तरूण,
त्याचे ते पिळदार बाहू बघितल्यावर झोपेत असूनही माझ्या लक्षात आलं की हा सैन्यातला
असणार. तिकीट तपासनीस आला, त्याला त्याने त्याचं तिकीट आणि मिलिटरी वॉरंट दाखवलं,
ते बघून खात्री पटली. लवकरच रेल्वेची सगळी बोगी निद्रिस्त झाली.
सकाळी उठलो तेंव्हा
तोही उठला होता. त्याच्याशी मुद्दाम बोलणं काढलं. सैन्यदलात तोफखान्यात तो लान्स
नाईक पदावर कार्यरत आहे आणि सध्या अंबाला येथे पोस्टेड आहे अशी माहिती त्यानं पुरवली.
त्याच्या घरचं कोणीच सैन्यात नव्हतं असही त्याला विचारल्यावर कळालं. “मग तू कसा काय गेलास सैन्यात?” या माझ्या प्रश्नाला त्यान दिलेलं उत्तर आवडलं.
तो म्हणाला “१९९९ ला कारगिल युद्ध झालं तेंव्हा ७ वीत होतो. आपणही लढावं, आपल्या छातीवर शौर्य
पदक मिरवावं अस त्याच वेळी ठरवलं. मग मित्रही तसेच भेटले. १० वीत असताना आमच्या
सर्व ग्रुपनं ठरवल की सैन्यात जायचं. एक दोन अपवाद वगळता सर्वांनी ते करून दाखवलं.” मला त्याच कौतुक वाटलं, त्याला शुभेच्छा देऊन
आम्ही आम्ही भोपाळला उतरलो.
आजकाल बुद्धी प्रामाण्यवाद
जरा जास्तच बोकाळलाय. कोणताही उपक्रम करा, “त्यात काय?, कशाला?, त्यानं काय होणार?” असे प्रश्न विचारून आपण नामानिराळे राहण्यात बरेच
जण धन्यता मानतात. स्वार्थत्याग हा शब्द उच्चारणं, वाचणं, सांगणं हे फार सोप्प
आहे. पण आचरणात आणण फार अवघड. त्यातून आपल्याला सर्वात प्रिय जो आपलाच जीव, त्याचा
डाव मांडण हे आणखीनच अवघड. आपल्या सर्वस्वाच प्रसंगी हवन करण हे कुठल्याही तर्कान समजावून
सांगता येणार नाही. “बुध्याची वाण धरिले करी हे सतीचे” असे म्हणणारे आणि तसे वागणारे एखादेच स्वातंत्र्यवीर.
अन्यथा प्रत्यक्ष त्या क्षणी अर्पित होताना कृत्कृत्यातेचा भाव मनात येणं हा त्या
वीर हृदयाचाच विजय.
काही निर्णय फक्त
बुद्धीच्या कसोटीवर न घेतलेलेच बरे. कारण निष्कारण बौद्धिक गुंता तयार करून सोडवायला
गेलं तर माणसाला वैराग्यच येईल, महाभारतात अर्जुनाला आलं तसं, आणि आपल्याला अस
वैराग्य आलं तर समजावून सांगायला भगवान श्रीकृष्ण काही येणार नाहीत!
आजच्या जगात
आतंकवादासारखी जी भीषण समस्या उत्पन्न झालीय त्यांचं तत्वज्ञान बौद्धिक कसोटीवर खरं
ठरू शकतच नाही. “त्यांची बुद्धी भ्रष्ट झालीय” अस आतंकवाद्यांविषयी म्हणलं जातं. या समस्येचं उत्तर त्याच्या जवळ आहे ज्याची
बुद्धी सन्मार्गी आहे पण हृदय या तत्वाचा हर तर्हेने सामना करण्यास उत्सुक आहे.
असे सर्व सन्मार्गी लोक एकत्र येणं, त्यांचं सामर्थ्य वृद्धिंगत होण हे एकच या
जागतिक समस्येवरच उत्तर आहे.
ही प्रतिशोधाची
भावना नाही किंवा त्यावर आधारित तत्वज्ञान नाही. पण जगात शांतता नांदायची असेल तर
ही गोष्ट हृदयानेच ठरवावी लागेल, मनापासून करावी लागेल आणि बुद्धीला स्वीकारावीच
लागेल.
अशी संधी येतीय
लवकरच. आपणही या संधीचा लाभ घ्या. ३ जानेवारी २०१६ रोजी रा.स्व. संघ पश्चिम
महाराष्ट्र प्रांतातील अश्या सज्जन शक्तीच एकत्रीकरण आहे, पुण्याजवळ मारून्जी या
गावात आपण सहभागी व्हा. या मोहिमेचा एक भाग बना.
No comments:
Post a Comment