Sunday, May 3, 2015

रिचार्ज

3मे २०१५, रविवारची संध्याकाळकमला नेहरू पार्क च्या दाराशी नेहमीप्रमाणेच गर्दी होतीकोणी आपल्या पाल्याबरोबर सुट्टीची संध्याकाळ एन्जॅाय करायला, कोणी व्यायाम करायला, कोणी वयस्क व्यक्ती समवयीन स्नेहींबरोबर पाय मोकळे करायला, तर कोणी आपल्या भावी जोडीदाराबरोबर आनंदाचे क्षण गोळा करायला तिथे आले होतेसुट्टीच्या दिवशी सायंकाळी उद्यानात जाणं, हा तर  वैयक्तिक विषय आहेलहान मुलांसाठी छोटंस्स मेरी गो राऊंड, मडक्यात विस्तव ठेऊन चणे विकणारा विक्रेता बंधू, थोड्याशा साहसी कुमारांसाठि घोड्यावरुन चक्कर, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी भेळ पाणीपुरी, आणि दरवाज्याच्या उएका बाजूला साबणाचे फुगे करण्याचं खेळणं विकणारी एक गरीब भगिनी, मनाची करमणूक होईल अशा अनेक गोष्टी तिथं घडत होत्यासामान्यपणे अशा वेळेस अनेकांना नकोसं वाटणारं असा निधी संकलनाचा उपक्रम हाती घेऊन आम्ही काही स्वयंसेवक तिथं उपस्थित होतोरास्वसंघ जनकल्याण समिती, नेपाळ भूकंप ग्रस्त सहायता निधी येथे स्विकारला जाईल" असा फलक लावून, हातात पत्रके आणि पावती पुस्तकं, खांद्यावर झोळी आणि एकाच्या हातात दान पात्र असा आमचा जथ्था नागरिकांना निधीसाठी आवाहन करत होताउपक्रमाची सुरुवात करुन थोडाच वेळ झाला होता, अजून एकहि दक्षिणा पदरात पडली नव्हती, एवढ्यात एक रिक्शा समोर थांबलीरिक्शा चालक उतरला, त्यानं फलक वाचला आणि खिशातून शंभर रुपयाची नोट काढून दानपात्रात टाकलीपावती करताना समजलं कि तो विश्रांतवाडीचा राहणारा आहे, त्यानं जाताजाता फलकावरचं नाव पाहिलं आणि अत्यंत विश्वासानं देणगी दिलीआम्हाला विशेष वाटलंउपक्रमाची सुरुवात तर चांगल्या हस्ते झाली

तास दीड तास गेला, स्वयंसेवक नागरिकांना आवाहन करत होते, निधीचा कुंभ भरत होताआम्ही स्वयंसेवकांनी आपापल्या परीने "शक्य" असलेलं अंशदान देऊन झालं होतंरात्री८-१५ च्या सुमारास गर्दी कमी होऊ लागली, इतक्यात समोरुन साबणाचे फुगे करणारं खेळणं विकणरी ती भगिनी आलीकरकर वाजणार्या पत्र्याच्या डब्यातून एक पन्नासची नोट काढून तिनं दानपात्रात टाकलीइतका वेळ हलकं वाटणारं ते दानपात्र अचानक मणामणाचं ओझं ठेवल्यासारखं जड झालंत्या ओझ्याला दोन पदर होतेअंशदान आणि योगदान या शब्दांमधला फरक जाणवणं हा पहिला, मला तर माझ्या क्षुद्रपणाची जाणीव झालीज्या विश्वासानं नागरिकांनी आणि त्या भगीनीने ते दान दिलं त्याच्या जबाबदारीचा तो दुसरा पदरदान म्हणून गोळा झालेली रक्कम सुरक्षितपणे पोचवण्याची जबाबदारी हि तर त्यातली फारंच किरकोळ बाब होती• "देणार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी" याचा अर्थ तिथं कळला, पण त्यातील "माझी" या शब्दावर माझं मन रिंगण घेऊन अडखळलंज्या बॅनरखाली आम्ही उभे होतो त्याच्यावरचा तो विश्वास.........अत्यंत निस्वार्थपणे , निरलसपणे आणि त्याचबरोबर प्राधान्यक्रमाने सेवारत अशा लाखो कार्यकर्त्यांच्या योगदानातून " रास्वसंघ जनकल्याण समिती" या संघटनेनं हा विश्वास संपादन केलायआपल्या हातून एक कणभरसुद्धा अशी चूक होऊ नये कि ज्यामुळे या विश्वासाला तडा जाईल असा दृढ निश्चय मी केलासंघाची पताका खांद्यावर घेऊन हा उपक्रम करताना माझा ऊर अभिमानानं भरून आलामी संघाचा स्वयंसेवक आहे आणि "कार्यकर्ता" म्हणून इथं उपस्थित आहे या जाणीवेनं मन भरुन आलंसंघाचं काम करणार्यांना असे अनुभव नवे नाहितपण असा "रिचार्ज" मिळण्यासाठी भाग्य मात्र लागतंच!