Wednesday, March 25, 2015

वळण

25/03/2015
त्या दिवशी सकाळी थोडं उशीरानंच कंपनीमधे जायला निघालो होतोकमालीच्या निराश मनस्थितीत•••••आनंदनगरला सिग्नलला गाडी थांबलीस्टिअरिंग वर हात ठेवून हताशपणे बसलो होतोरस्त्याच्या बाजूला डोंबार्याचा खेळ चालू होतात्याची ती चिमुरडी पोर दोरीवरून चालण्याची कसरत करत होतीमाझ्या मेंदुनं त्याची नोंद घेतलीमोरपिसांचा टोप आणि झिरमिरित अंगरखा घातलेल्या वासुदेवानं रस्ता ओलांडताना माझं लक्ष विचलित केलंहिरवा दिवा लागला, वाहनांचा प्रवाह सुरू झालामाझ्या मनात विचारांचा लोळ उठलाडोंबार्याच्या दोरीवरच्या कसरतीमधे आणि माझ्या तत्कालिन कामात मला नकळत साम्य दिसू लागलंवस्तू विपणन करत ग्राहकांचे उंबरे झिजवणं आणि वासुदेवासारखं भक्तिचे गोडवे गात दारेदार फिरणं यातला भेद मला पुसट भासू लागलाविचारांच्या गर्तेत मी यंत्रवत गाड़ी चालवत होतोमाझ्या मेंदूनं रस्त्यावर घडणार्या घटनांची नोंद ठेवणं सोडून दिलं
कंपनीत पोचताच संपलेली कामं, त्यासाठी ग्राहकांकडून होणारा पाठपुरावा, देणेकर्यांचा तगादा, सहकार्यांच्या अपेक्षा•••••••••सगळं पुन्हा सुरू होणारदिवस याच उठाठेवीत जाणार पुन्हा संध्याकाळ होणार मग रात्र••••••दुसरा तस्साच दिवस उगवण्यासाठी•••••
पुढच्या सिग्नलला गाडी थांबलीया रस्त्यावरचे सिग्नल सगळे असेच, प्रत्येक वेळेस लाल दिवा ठरलेलाच! विझू पाहणार्या डोळ्यांनी मी आरशात पाहिलं. आरशात दिसणारा निस्तेज चेहर्याशी माझी नव्याने ओळख होत होतीका? का? का? अचानक आज पर्यंत कधीच केलेली एक कृती केलीमनगटावरचं घड्याळ काढून मागच्या सीटवर फेकून दिलं• " कृपया आजचा दिवसभर मला फोन करू नका, तब्येत बरी नाहिये" असा निरोप कंपनीत पाठवला आणि फोन बंद करून टाकलासिग्नल सुटला आणि गाड़ीनं वळण घेऊन सातारा रस्ता पकडला
तासाभरातंच भोर ओलांडून वरंध घाटाकडे गाडी धावू लागलीकाल झालेल्या अवकाळी पावसामुळे जागोजाग पाणी साठलेलं होतंहिरडस मावळातला नदीच्या काठाकाठानं जाणारा तो माझा आवडीचा रस्ताआज बर्याच दिवसांनी इकडे आलोपूर्वीच्या ओळखीच्या खुणा बदलल्या, पण या परिसरानं घातलेली मोहिनी काहि कमी झाली नाहीअरूंद रस्ता आणि अवघड घाट यामुळे या रस्त्यावर वाहनांची वर्दळ जरा कमीच असतेआणि त्यामुळेच या रस्त्यावरून सफर करायला वेगळीच मजा येतेनिरा देवघर प्रकल्पामुळे रस्ता बदललाय तसंच या खोर्याचं सौंदर्यहिआज मात्र माझं तिकडं लक्ष नव्हतंकुठे तरी जाऊन शांतपणे बसावं आणि डोकं फुटेपर्यंत विचार करावा, यासाठी मी स्वाभाविकपणे हा परिसर निवडला होताधरणाच्या भिंतीच्या अलिकडे एका ठिकाणी प्रवाह थोडा संथ होते, एक छोटासा डोह असावा तसात्याच्याजवळ रस्त्याच्या कडेला मी गाडी उभी केलीपावसामुळे भिजलेल्या पालापाचोळा तुडवत मी नदीच्या काठावरून चालत निघालो• ' दादा, पाण्याजवळ खूप गाळ साचलाय, पाय फसंल...' गुरं घेऊन जाणार्या एका गावकर्यानं सल्ला दिला, मी त्याच्याकडे बघून उगाचंच हसलोडोक्यावरून सरपणाचं ओझं घेऊन जाणार्या दोन भगिनींनी माझ्याकडे विचित्र कटाक्ष टाकलामला त्यात सहानुभूती आढळली नाही, तिर्हाईतानंही सहानुभूती दाखवावी असं काहि वेगळंच घडलं नव्हत माझ्याबाबतीत पण अपेक्षा होती
नदी पात्रात उतरून मी एका ऐसपैस दगडावर निवांत बसलो, अगदी महाविद्यालयीन जिवनापासूनच्या घटना आठवतअनपेक्षित आलेल्या अवघड प्रश्नपत्रिका आणि उडालेली गाळण, त्या त्या वेळेस ठरवलेले  पण हमखास पाळलेले अभ्यास करण्याचे प्रण अन मग त्याचा काढलेला राग आठवलाव्यवसायात वेगानं प्रगती करण्यासाठी केलेल्या तडजोडी, त्यापायी झालेली कुतरओढ, प्रत्यक्ष किंवा काल्पनिक स्पर्धेत यशासाठी केलेली धडपड, एखाद्या अननुभवी फलंदाज ज्याप्रमाणे येणारा प्रत्येक चेंडू फटकावायचा प्रयत्न करते त्याप्रमाणे येणारी प्रत्येक संधी साध्य करण्यासाठी केलेली उठाठेव, त्यापायी योग्य सल्ला देणार्यांकडे केलेलं दुर्लक्षचुकलेले आडाखे आणि फसलेली समीकरणे, वाया गेलेले श्रम आणि तुटलेली माणसे, सगळ्याची जंत्रीच समोर तयार झालीदोष कुणाला देऊ? परिस्थितिला, सहकार्यांना कि नशीबाला? तसं नशिबाला दोष देणं फारच सोप्प कारण ते मूर्त स्वरूपात समोर नसतंच मुळी! एकेका घटनेचं सावकाश विश्लेषण करत गेलोकाहि इसे संदर्भ सापडले कि जिथे आडाखेच चुकले, परिस्थिति अचानक बदलली आणि अपयश पदरी पडलंपण बहुतांश वेळी असा परिस्थिति ला दोष देता येईल असं काही सापडेनाअपयश म्हणतात ते हेच का? असा प्रश्न मला पडू लागलाउद्योगाची अशी दयनीय अवस्था होण्याची कारणं मी शोधत होते, यावर काही उपाय नाही अशी ठाम धारणा होण्याआधीचा एक शेवटचा प्रयत्न करावा महणूनसहज तळहाताकडे पाहिलंकाम करताना झालेल्या जखमांचे व्रण मला दिसले, हातावरच्या उत्कर्ष दाखवणार्या रेषा मात्र फारच पुसटशा दिसू लागल्याखरंच यावर उत्तर नाही? इतके दिवस रक्त आटवून काहिच मिळालं नाही? मग आता पुढे? अचानक वाटलं कि मी कारण परंपरेच्या उगमाजवळ बसलोयलहानपणी ऐकलेली हरणार्या रेसच्या घोडा आणि प्रेमापोटी त्यावर पैसे लावणार्या मालकाची गोष्ट मला आठवली
नदीच्या प्रवासात प्रवाहात कधी भोवरे तयार होतातप्रवाहित वाहणारे कण त्यात सापडतात आणि खोल खेचले जातातकाय होत त्यांच? पण नदीचा सगळा प्रवाहंच भोवर्यात अडकलेला कधी पाहिला नाहीमी कोण? जीवनप्रवाहातला एक कण, एखादि धारा कि अख्खा प्रवाहंच? मी असं एखाद्या भोवर्यात अडकावं का?
किती वेळ बसलो होतो मला आठवत नाही पण जुनी दुखणी काढताना बराच वेळ झाला असणारमधल्या काळात वारा सुटून आकाश झाकोळून गेल्ं होतंरिपरिप पावसाला सुरुवात झालीआईची आठवण आली,आत कुठेतरी खोलवर झालेली जखम पुन्हा वाहू लागली• " मला माझ्या चुकांसाठी माफ कर" अस म्हणायची संधी सुद्धा देता ती अचानक निघून गेलीज्या मातीचा हा देह तो त्या मातीत सहज विरघळून जावा अशी किमया हा पडणारा पाऊस दाखवू शकेल का?

या मातीत, या पाण्यात जी मूलद्रव्य आहेत तीच माझ्या शरीरात आहेत, फरक इतकाच कि एका विशिष्ट गुणसूत्रात गुंफल्यामुळे त्याचा हा देह बनलायया सूत्राचा निर्माता कोणहि तर परमेश्वराची इच्छा,   नक्कीच! परमेश्वराची? लख्खन वीज चमकलीढगांना बाजूला सारत उन्हाची एक तिरिप समोर नदीत उतरली होतीसहज वर पाहिलंकाळ्या ढगांच्या पार्श्वभूमीवर अनेकरंगी इंद्रधनुष्य दिसत होतंअनुभवांच्या रोजमेळातील खर्चाची डावी बाजू तर मांडून पूर्ण झाली होतीइंद्रधनुष्यातल्या एकेका रंगानं त्या उजव्या जमेच्या बाजूवर प्रकाश टाकायला सुरूवात केलीकेलेल्या प्रयोगातून मिळालेलं ग्यान आणि त्या त्या विषयात मिळालेली अधिकारवाणी, सहकार्यांनी दिलेली साथ , शेजारी आणि आप्तांनी दिलेलं पाठबळ, ज्येष्ठांनी मारलेली कौतुकाची थाप, प्रयत्नपूर्वक आत्मसात केलेली कौशल्ये या सर्वांनी जमेची बाजू थोरली झालीपौरूषेय स्फूर्तीची लहर माझ्या शरीरात संचारलीमी उठलो, गाडीजवळ गेलोसहज नदीकडे लक्ष गेलं, नदीच्या प्रवाहानं घेतलेलं वळण मला स्पष्ट दिसलं!

No comments:

Post a Comment